सद्गुरुचरण का असावे ?

नमस्ते माझ्या मित्रमैमिणीनों,
आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. जो मी तुमच्या सर्वां सोबत शेअर करतेय. खरंतर मी फक्त एक सामान्य माणुस म्हणुन मला जे वाटते, जे डोक्यात विचार येतात आणि घोळत राहतात तसेच मला आलेल्या अडचणी, अनुभव आणि मी माझ्या व माझ्या कुंटुंबाच्या सुखासाठी प्रयत्न करताना झालेल्या चुका, यश, अपयश, मते आणि हे सगळे आपल्याशी बोलण्याची इच्छा झाली म्हणून ब्लॉग लिहायला घेतला. उद्देश इतकाच की, यातुन वाचणा-या व्यक्तींना त्यांच्या सुखासाठी मार्ग मिळावा, अडचणींवर मात करता यावी, म्हणजे, “पुढच्यास ठेच मागचा शहाणा !” असे काहीसं.
आपण आयुष्यात पुढे जाताना प्रत्येक टप्यावर कोणी ना कोणी गुरु असतोच जसे आई, वडिल, भाऊ, बहिण, आजी, आजोबा, मित्रमैत्रिणी, जवळचे नातलग, शाळेचे शिक्षक, आणि एखादा प्रसंग घडताना काहीतरी शिकवून जाणारी प्रत्येक व्यक्ति, मग ती लहान असो वा मोठी. आयुष्यात येणारे सगळे प्रसंग देखील काहीतरी शिकवण देणारेच असतात. पण खरंच आपण काही शिकलो का ? या सगळ्यातून, काही बोध घेण्याचा प्रयत्न करतो का ? अरे हो मला हेच म्हणायच होत, “आपण जर आलेल्या प्रसंगातून, अनुभवातून काही चांगले, सकारात्मक , शिकलो तर येणा-या पुढच्या अनुभवाना सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये हळू हळू जमा व्हायला लागते.” म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात येणारी चांगली वाईट सर्वच परिस्थिती आपल्याला सुख दुःख देऊन जाते. पण यातुन आपण काय घेतो हाच खरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण चांगली आणि सुखाची परिस्थिती आली की, आपण इतके हुरळून गेलेलो असतो की जे सुख आलेय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच आलेय असे वाटुन आपण आपल्याच बढ़ाया सांगत राहतो. याऊलट थोडेसे जरी दुःख मिळाले, प्रसंग आला की आपण परमेश्वराला दोष द्यायला सुरवात करतो, “माझ्याच वाट्याला का ? सगळ्या जगात मीच सापडलो का तुला ? अजून किती परिक्षा घेशील ? वगैरे वगैरे.” खरंच आपण किती स्वार्थी विचार करतो ना ? चांगले झाले, सुख मिळाले की माझ्यामुळे आणि दुःखाचे प्रसंग आले की ते भगवंतामुळे, दुस-यामुळे असे ठरवून टाकतो.
आपण हे कधीच पाहत नाही की येणारे सुख दुःख हे आपल्याच चुकीच्या व बरोबर कर्मांचा परिपाक असतात. खूप वरवर आपण या गोष्टींना बघतो आणि बोलत राहतो, प्रतिक्रिया व्यक्त करतो. तुम्ही म्हणाल हे कसे काय बरं, पण मी जे म्हणतेय ते अगदी बरोबर आहे. आणि पडताळून पहायचच असेल तर एक साधे उदाहरण बघू , आपण रस्त्यांनी चाललोय आणि चालता चालता एका दगडाला ठेचकाळुन पडतो आणि आपल्याला लागतं तेंव्हा आपण बोलून जातो अरे रस्त्यात दगड मध्येच कुठुन आला, माझ्याच रस्त्यात मध्ये यायचा होता का ? इत्यादी. पण बघायला गेलं तर देवाने बुद्धि दिलीय ती माणसाला दगडाला नाही. त्यामुळे तो दगड रस्त्यात मध्येच आहे याची तक्रार करण्यापेक्षा आपणच सावधपणे पावले टाकत असतो तर पडलो नसतो. म्हणजेच काय तर आपले कर्मच आपले चांगले व वाईट निश्चित करतात.
त्याचप्रमाणे आपले भोग, भाग्य, फलप्राप्ती इत्यादी आणि हे सगळे आत्ताच्या आणि मागील जन्मातील आपल्या काया वाचा मनोभावे केलेल्या कर्माचे फलित असते. हिच कर्मफले, आपण कर्माचे शास्त्रानुसार अगर अध्यात्मानुसार म्हणा अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक ताप या रुपात भोगत असतो. मग प्रश्न पडेल की आता हे कमी करण्यासाठी अगर चांगल्या फलप्राप्तीसाठी काय करावे ? म्हणजे भोग कमी होतील आणि भाग्य उजळेल. या सर्वांसाठी एकमेव पर्याय म्हणजे “भगवतभक्ती”. पण ती आपल्या कडुन योग्य रितीने घडली पाहिजे. आता पुन्हा प्रश्न की, “म्हणजेच आपण जी भक्ती करतोय ती योग्य नाही का ? आणि योग्य भक्ती कशी करायची ? ” अशा भक्तीसाठी त्याचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि हे ज्ञान मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे “सद्गुरू चरण” ठामपणे धरणे. फक्त आणि फक्त सदगुरुच आपल्याला आपली स्वतःची, आपल्या योग्य अयोग्य कर्माची, तसेच भगवंताची, भक्तीची ओळख करून देवून, त्या योग्यतेच आपल्याला बनवू शकतात. योग्य भक्ती कशी करायची, यासाठीची साधने काय आहेत ? हे फक्त सदगुरुच सांगु शकतात. अशा भक्तीसाठी लागणारा विवेक आणि जाणीव ते आपल्यामध्ये आणतात. भगवंत कसा आणि तो कसा मिळवायचा हे सहजसोप करून दाखवून ते आपल्यामध्ये उतरवतात.
श्री सद्गुरू, अशा सवयी लावुन देतात की त्यायोगे भौतिक तसेच अध्यात्मिक प्राप्ती ही ठरलेलीच असते. संत रामदास तर हे सांगतात की, यमयातना खात्रीने चुकवायच्या असतील तर लवकरात लवकर सद्गुरु चरणांचा आश्रय घेतला पाहिजे. त्यांच्यावर पूर्ण विश्वास व निष्ठा ठेवून त्यांनी सांगितलेल्या साधनांचा वापर प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे करून, त्यांच्यासमोर संपूर्ण सर्व भावबंधातून नतमस्तक झाले की ते आपली जिवननौका पार लावतातच.
खरंच हे करा आणि मला सांगा.
तुम्ही निश्चित समाधान आणि सुख शांती मिळवाल हा माझा विश्वास आहे. पुढच्या भेटीपर्यंत खुश रहा, मस्त रहा, आनंदी रहा.

भेटू लवकरच. . .


Posted

in

by

Tags:

Comments

51 responses to “सद्गुरुचरण का असावे ?”

  1. Prajwal Avatar
    Prajwal

    🙏🙏

  2. Priya mote Avatar
    Priya mote

    खूप सुंदर, अप्रतिम लेख आहे, संसार रुपी भवसागर पार करून जायचे असेल तर सद्गुरु चरण घट्ट धरण्याशिवाय पर्याय नाही, आज गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु चरण का पाहिजे याची जाणीव झाली.

    1. संतोष कदम Avatar
      संतोष कदम

      लेख खुपच छान आहे, सदगुरु चरण का पाहीजे याची जाणीव छान पध्दतीने करुन दिली त्याबद्दल धन्यवाद, जय सदगुरु 🙏🙏

    2. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much. You are my big support and inspiration. Once again thanks a lot.

  3. Snehal Avatar
    Snehal

    Khup chan, 👌👍

    Thank you for sharing good thoughts,😊

  4. Salim Avatar
    Salim

    खुप छान…
    Keep it up…
    Next blog we want some deep thoughts…

    1. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much. I will try my best.

  5. अंजली Avatar
    अंजली

    आयुष्या मध्ये नेमकं कसे वागावे,काय कराव आणि भक्ती कशी असावी किंवा कशी करता यावी, कुठेही भरकटत न जाता योग्य मार्गदर्शन सध्याच्या पिढीला नक्की मिळेल असे हा लेख वाचून समजून आले पुढील लेख वाचण्याची समजाण्याची आतुरता वाढली आहे
    खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐

    1. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much for your nice comments and support. i will try my best.

  6. Prajakta yadav Avatar
    Prajakta yadav

    🙏🏻🙌🏻❤

  7. Dr Vijay Avatar
    Dr Vijay

    खूपच सुंदर लेख आहे

    1. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much for your nice comments and big support.

  8. Amruta Mirje Avatar
    Amruta Mirje

    Great madam keep it up your blog was very helpful for us in future thanks a lot

    1. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much for your comment and support.

  9. Piyush Avatar
    Piyush

    🙏🙏🌸🌸

  10. Akshata Wagh Avatar
    Akshata Wagh

    🙏🙏🙏

  11. Pravin Bhosale Avatar
    Pravin Bhosale

    छान माहिती आहे
    खूपच छान
    जय गुरदेव

  12. Snehal Avatar
    Snehal

    Khup chan👌👍
    Thank you for sharing your good thoughts..

  13. Sneha Avatar
    Sneha

    खुप छान लेख आहे 🙏🙏

  14. Sandip lambe Avatar
    Sandip lambe

    खूप छान आहे

  15. सदानंद पेटकर Avatar
    सदानंद पेटकर

    खूपच छान आवडले

  16. Rupesh Gaikar Avatar

    उल्का ताई खूप छान लेख लिहला आहे👌👌👌
    सद्गुरुविण सापडे ना सोय !
    धरावे ते पाय आधी आधी !!

      1. Shashikant Patil Avatar
        Shashikant Patil

        👌👌👌👌
        Very nice

  17. Sahil Narde Avatar
    Sahil Narde

    🙏🙏🙏

  18. Rajendra Namdev Desai Avatar
    Rajendra Namdev Desai

    Very nice

  19. Rajendra Namdev Desai Avatar
    Rajendra Namdev Desai

    खूपच छान

  20. Nand Kishor Avatar
    Nand Kishor

    खूप छान लिहिला आहे
    पहिला ब्लॉग आहे, असं वाटत सुद्धा नाही.
    तुम्हाला लिहायची नेहमी सवय असावी की काय असं वाटण्या इतपत छान आहे.
    आणि सुरुवात पण व्यास पौर्णिमेला केलेली आहे, हे उत्तम आहे.
    मी नक्कीच माझ्या सर्व कॉन्टॅक्ट ना हा ब्लॉक शेअर करेन.🌹🌹
    भावी ब्लॉग साठी शुभेच्छा. जय सद्गुरू🌹🌹🙏🙏

    1. Shobha Sachin Patil Avatar
      Shobha Sachin Patil

      खूप छान लिहिला आहे

      1. caringhandssupport.online Avatar

        Thank you so much for appreciation

    2. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much for such nice comments and support. Its means a lot me. Please suggest subjects.

  21. Madhura Avatar
    Madhura

    खुप सुंदर
    जय सदगुरु

  22. Madhuri Avatar
    Madhuri

    🙏🙏🙏

  23. साक्षी कोकाटे Avatar
    साक्षी कोकाटे

    खूप सुंदर विचार खूप सुंदर लेख आहे. कसे बोलावे, कसे वागावे, कसे शिकवावे आणि कसे शिकावे सर्व काही सांगून जातो हा लेख.
    राम कृष्ण हरी ll

    1. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much for nice comments.

  24. साक्षी कोकाटे Avatar
    साक्षी कोकाटे

    खूप सुंदर लेख आहे.

  25. Ajay patil Avatar
    Ajay patil

    आऊष्यात गुरूचे महत्त्व किती आहे हे ह्या लेखातून समजल
    🙏जय सदगुरू 🙏

  26. Pratik Patil Avatar
    Pratik Patil

    🙌👏

  27. Harshvardhan patil Avatar
    Harshvardhan patil

    Nice 👌👍

  28. Prashant Patil Avatar
    Prashant Patil

    खुप छान लेख आहे उत्तम ज्ञानाची ओळख होण्यासाठी अणि ते आत्मसात करण्यासाठी त्याप्रमाणे जिवन जगण्यासाठी गुरूचं चरण फार आवश्यक असल्याचे ज्ञान या लेखातून मिळाले आहे . जीवनात अनेक अडचणी येतात पण डगमगून न जाता धैर्याने सामोरे जाण्यासाठी ऊर्जा गुरु चरणी निवेदन ठेवल्याने मिळते. तुमच्या लेखणीतून असे सद्विचार आपण लिहित रहा आपणास खूप खूप शुभेच्छा !! जय सद्गुरु !!

    1. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much sir for your precious compliments. I will try my best.

  29. Mangesh Dattatray Nigade Avatar
    Mangesh Dattatray Nigade

    होय खूप छान व सुंदर लेख आहे👌👌 माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी येतच राहतात पण डगमगून न जाता,आपले लक्ष्य विचलित न होवू देता संकटाला पूर्ण ताकदिनिशि सामोरे जायचे असेल तर त्यासाठी फक्त सदगुरुच आपल्याला मदत करू शकतात हे खरे आहे त्यासाठी आपल्या भक्तीतही भगवंता बदल तेवढीच ओढ असायला हवी .आणि म्हणुनच सर्वानी सदगुरूंच्या नामस्मरणात राहिले पाहिजे व आपल्या गुरू वरती पूर्णपणे विश्वास ठेवून आपले चांगले आणि खरे कर्म करत राहिले पाहिजे.आपल्या चांगल्या व खरय कर्माची फळे सदगुरू एक ना एक दिवस नक्कीच आपल्या पदरात टाकतील असे मला वाटते. आपणास खूप खूप शुभेच्छा !!
    👏👏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏👏

    1. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much dada. Namsmaranashivay paryay nahi.

  30. Adv Vandure patil Avatar
    Adv Vandure patil

    Very nice👌✌️

  31. Rahul Kulkarni Avatar
    Rahul Kulkarni

    आपली विचार सुमने अंतर्मनाला स्पर्श करून जाणारी आहेत. सद्गुरुच अपनाला अंधारातून प्रकाशाकडे, तिमिरातूनी तेजाकडे.. जाण्याचा मार्ग दाखवू शकतात. खूप छान जय सद्गुरू.

    1. caringhandssupport.online Avatar

      Thank you so much sir. Nakkich sadguruch marg dakhavtat. Jai Sadguru.

Leave a Reply to साक्षी कोकाटे Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *